शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार- नारायण राणे

0
179

सिंधुदुर्ग : कोकणातून शिवसेनेला हद्दपार करणार, असं म्हणत भाजप नेते नारायण राणे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हे वक्तव्य केलं.

कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. कोकणातून शिवसेनेला हद्दपार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असंही नारायण राणे यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, असं म्हणत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?; मनसेचा राज्य सरकारला सवाल

चंद्रकांत पाटील यांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही- हसन मुश्रीफ

‘हे’ सरकार शेतकरी, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे शत्रू आहे; प्रियांका गांधीची मोदी सरकारवर टीका

कोल्हापुरात निवडून नाही आलो, तर हिमालयात जाईन- चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here