रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर बोलताना पुन्हा एकदा भाषा घसरली.
‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणाव. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणाव. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती., असं राणे म्हणाले होते. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नारायण राणेंनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की, मा. उद्धवजी ठाकरे असतील किंवा इतर शिवसेना नेते असतील यांच्याबद्दल वाईट वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची धमक आम्हा मावळ्यांमध्ये आहे. हे कदापी राणेंनी विसरू नये, असा इशारा राऊतांनी यावेळी दिला.
दरम्यान, स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटूगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळाल्यानंतर मानसिक संतूलन बिघडलेलं आहे. इथे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या बद्दल असं वक्तव्य करण्याऐवजी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी ज्या तिरंग्यावर ज्या नतद्रष्टांनी भाजपचा झेंडा ठेवला होता. त्यांचे आधी हात छाटावे, असं जोरदार प्रत्युत्तर राऊतांनी यावेळी दिलं.
महत्वाच्या घडामोडी –
आता या सरकारची हंडी फोडण्याची वेळ आलीये- अतुल भातखळकर
ठाकरे कुटुंबीयांवर टीका करणं हेच राणेंचं पोट भरण्याचं साधन- निलम गोऱ्हे
“मी असतो तर कानाखाली लगावली असती; मुख्यमंत्र्यांवर बोलताना नारायण राणेंची जीभ घसरली”
कोरोना काळात खचून न जाता राजेश टोपेंनी आपली भूमिका सार्थपणे निभावली- सुप्रिया सुळे