“शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”

0
1070

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता कल्याण डोबिंवलीमध्ये शिवसेनेनं भाजपला दणका दिला आहे.

कल्याण-डोंबिवली भाजपचे माजी नगरसेवक विशाल पावशे यांनी पक्षाला रामराम ठोकत शिवबंधन हाती बांधलं. शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विशाल पावशे व त्यांच्या असंख्य समर्थकांनी शिवबंधन हाती बांधलं.

हे ही वाचा : मुंबईत पर्यटनाला मिळणार चालना, दादर चौपाटीच्या धर्तीवर ‘व्ह्युवींग डेक’ उभारणार- आदित्य ठाकरे

दरम्यान, दोनच महिन्यांपूर्वी भाजपच्या 3 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. या धक्क्यातून सुधारत नाहीच तोवर आज शिवसेनेनं भाजपच्या माजी नगरसेवक विशाल पावशे यांना पक्षात सामील करून घेत भाजपला आणखी एक धक्का दिला.

महत्वाच्या घडामोडी –

मनसेचं मिशन पुणे; राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘शिवतीर्थ’ वर महत्वपूर्ण बैठक

“कृष्णा चमकला, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची वेस्ट इंडिजवर 44 धावांनी मात, मालिकेत आघाडी”

संजय राऊत तुमची जागा आता “आत”, त्यामुळे धमक्या देणं बंद करा; नारायण राणेंचा हल्लाबोल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here