Home पुणे सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील

सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेनं ठरवावं- चंद्रकांत पाटील

पुणे : औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली आहे.

औरंगाबाद महापालिकेत सत्ता आल्यास पहिल्या दिवशी संभाजीनगर, असं नामकरण करु असं म्हणत काँग्रेसने याला विरोध केला आहे. त्यामुळे हा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लावण्यासाठी सत्ता पणाला लावायची की नाही, हे शिवसेनेला ठरवायचं आहे आणि तिथेच राजकारण आहे. किंवा शिवसेनेनं काँग्रेसची मन परिवर्तन करावं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादचं नामकरण हा श्रद्धेचा विषय आहे, संभाजीनगर हे नाव सगळ्यांना मान्य असून हा राजकारणाचा विषय नाही, असंही पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मनसेबाबत भूमिका स्पष्ट केली.

महत्वाच्या घडामोडी-

“शिवसेनेच्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश”

शिवसेनेचा भगवा हिरवा झाला आहे का?; नामांतरावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

वा! ही तर टाटा, बिर्लांची सेना; आशिष शेलारांची शिवसेनेवर टीका

“काँग्रेस नेते व माजी सहकारमंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं निधन”