नागपूर : शिवसेनेकडून औरंगाबादचा उल्लेख हा कायम संभाजीनगर असा केला जातो. तसंच संभाजीनगर असं औरंगाबादचं नामकरण केलं जाईल असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. मात्र यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलं की, जर शिवसेनेनं औरंगाबादचं नामांतर करण्याचा निर्णय घेतला तर काँग्रेसचा त्याला विरोध असेल. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेला फक्त निवडणूक जवळ आल्यावरच औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा आठवतो, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. तसेच महानगरपालिकेची निवडणूक झाली की, शिवसेनेला या मुद्द्याचा विसर पडेल, असंही फडणवीसांनी म्हटलं. ते नागपुरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, काँग्रेसने संभाजीनगर नावाला विरोध केला काय किंवा नाही काय, पण शिवसेना हा मुद्दा केवळ निवडणुकीपुरता वापरत आहे. या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये केवळ नुस्तं कुस्ती सुरु आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला.
महत्वाच्या घडामोडी-
केंद्र आणि राज्य सरकारकडे कोणताही ठोस प्लॅन नाहीत, लोकं सांगतात अन्…;प्रकाश आंबेडकर
2020 नं खूप काही शिकवलं- उपमुख्यमंत्री अजित पवार
“कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक भाजप ताकदीनिशी लढणार”