Home महाराष्ट्र “अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”

“अहमदनगरमध्ये महापाैरपदाच्या निवडणूकीत शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र”

मुंबई : राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी युतीची चर्चा सुरु असतानाच आता ही युती प्रत्यक्षात उतरली आहे. अहमदनगरमध्ये आता शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज दुपारी याबाबत मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही पक्षांचे काही नगरसेवक उपस्थित होते.

दरम्यान, अहमदनगर महापौरपदाच्या निवडणुकीत महापौरपदासाठी शिवसेनेचा उमेदवार असणार आहे. तर राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडीतील ‘आणखी’ एक पक्ष स्वबळावर मैदानात”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो, हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

14 दिवसाचं अधिवेशन झालं तर…; सुधीर मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर टीका

सरकार पावसाळी अधिवेशनापासून पळ काढतंय- प्रवीण दरेकर