आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : मुंबई, पुण्यासह महत्वाच्या महापालिका निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-शिवसेना युती होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी सुरूवातही केली आहे. मंगळवारी रोजी शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी-शिवसेना युतीच्या चर्चेला पेव फुटले आहे.
हे ही वाचा : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज अज्ञात व्यक्तीकडून हॅक; सायबर सेलकडे तक्रार
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी पुण्यात शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि सहसंपर्कप्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांचं मत जाणून घेऊन मुंबईत मातोश्रीवर त्याची माहिती दिली जाणार आहे.
दरम्यान, पुण्यात महापालिकेत महाविकास आघाडी एकत्र येणार का? याच मुद्द्यावर आता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बैठक होत आहे. येत्या आठवड्याभरात पुण्यात आघाडीबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. तर शिवसेनेचं मात्र 31 ऑक्टोबरला ठरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेनेशी बंडखोरी केलेल्या माथेरानच्या’ त्या’ नगरसेवकांचा फैसला आता जिल्हाधिकाऱ्यांच्या हातात”
“एडन मार्क्रमची नाबाद अर्धशतकी खेळी; दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजवर 8 विकेट्सने दणदणीत विजय”
मला आणि मुलांना ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत; क्रांती रेडकर यांचा गंभीर आरोप