Home महाराष्ट्र ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची

ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

ठाणे : आज ठाण्यात कळवा येथील खारीगावमध्ये उड्डाणपुलाच्या लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाविकास आघाडीतील शिवसेना आणी राष्ट्रवादी या दोन पक्षातील कार्यकर्ते पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदेंच्या उपस्थित हा कार्यक्रम सुरू होण्याआधी राष्ट्रवादी  आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले, हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे राज्यात जरी एकत्र असले तरी स्थानिक पातळीवरची खदखद पुन्हा बाहेर आली आहे.

हे ही वाचा : शिवसेना म्हणजे मराठी माणसाचा श्वास, महाराष्ट्रात मराठी पाट्यांबाबत उलटसुलट चर्चा करणाऱ्यांनी…; शिवसेनेचा घणाघात

बॅनरबाजीवरून या सगळ्या वादाला सुरूवात झाली. कळव्यातील खारीगाव उड्डाणपुलाच्या लोकार्पणावरून श्रेयवाद उफाळून आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला शिवसेनेचे बॅनर दिसून आले, त्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले, काही वेळातच नंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले.

दरम्यान,  महाविकास आघाडीतील कार्यकर्ते आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेकदा कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

नावात राष्ट्रवादी असल्यानं पक्ष राष्ट्रीय होत नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

मला आता चंद्रकांत पाटलांशी बोललंच पाहिजे; जयंत पाटलांचा टोला

‘…तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही’; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा