Home महाराष्ट्र शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार

शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे- अजित पवार

मुंबई :  2022 साली होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे संकेत देत शिवसेना आपला मित्रपक्ष आहे. शिवसेना कायम मुंबईत क्रमांक एकचा पक्ष राहिलेला आहे. यावेळी शिवसेना क्रमांक एकचा पक्ष राहिलाच पाहिजे परंतू शिवसेने खालोखाल राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष झाला पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

मुंबई महानगरपालिकेत यावेळी कमीत कमी 50 ते 60 नगरसेवर निवडून आले पाहिजेत, असं काम कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षित असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

दरम्यान, मुंबईत आपल्याला राष्ट्रवादीला एवढं मजबूत करायचं की ज्यावेळी मुंबई महानगरापालिकचं जागावाटप होईल त्यावेळी शिवसेनेला आपल्याला बरोबरीच्या जागा मागता येतील, असं अजित पवारांनी यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“आमच्या दाताचे आणि घशाचे विषय किरकोळ आहेत, पण…”

तुमचे दात जास्तचं दिसताहेत ते सांभाळून ठेवा; चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर पलटवार

शिवसेना औरंगाबादचे रक्षण काय करणार? औरंगाबादचे रक्षण भाजपच करू शकते- चंद्रकांत पाटील

ठाकरे सरकार करणार 1 लाख 1 हजार पदांची मेगाभरती !