आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नाशिक : राज्यात जे राजकीय नाट्य घडत होते आणि शिवसेनेचे आमदार फुटत होते. त्यातून आनंद नव्हे, तर वेदना होत होत्या. त्याला कारण म्हणजे शिवसेना आम्ही उभी केली. अशा पद्धतीनं शिवसेना फुटत असताना दुःख होत होतं, असं मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “फडणवीस मुख्यमंत्री झाले नाहीत म्हणून कितीतरी भाजपाचे नेते ढसाढसा रडायला लागले”
मनसेची स्थापना झाली त्या वेळेस इतर पक्ष फोडायचे नाही, ही आमची ठाम भूमिका होती. या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. कोणाचा पक्ष फोडला नाही, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी उद्धव ठाकरेंना यावेळी लगावला.
दरम्यान, मनसेच्या नाशिक येथील राजगड कार्यालयाच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्ता संवाद मेळाव्याचे आयोजन परशुराम साईखेडकर नाट्यगृहात करण्यात आले. या वेळी बाळा नांदगावकर बोलत होते.
महत्त्वाच्या घडामोडी –
‘…याचं भान सर्व राजकीय नेत्यांनी बाळगायला हवं’; अमित ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका
अमित शहांनी मला दिलेलं वचन मोडलं, अन्यथा…; उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा