शिवसेना आमदारांचा जल्लोष; गोव्याच्या हॉटेलमध्ये फुल सेलिब्रेशन

0
279

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पणजी :  शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलं आहे. या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळलं असून शिवसनेचे बंडखोर आमदार आणि भाजप यांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे.

बंडखोर नेत्यांचे प्रमुख एकनाथ शिंदे आज गोव्यातून मुंबईत दाखल झाले. त्यांनी फडणवीसांबोत राजभवनावर जावून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली.

हे ही वाचा : मोठी बातमी! आजपासून महाराष्ट्रात शिंदे सरकार; आज सायंकाळी 7 वाजता होणार शपथविधी? 

एकनाथ शिंदे यांची राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर तिकडे गोव्यातील ताज हॉटेलमध्ये थांबलेले शिवसेनेचे इतर बंडखोर नेते यांचा आनंदाचा पारा राहिला नाही. त्यांनी ताज हॉटेलमध्ये प्रचंड जल्लोष केला.

शिवसेनेच्या सर्व आमदारांचा आनंद गगनात राहिला नाही. आमदार अक्षरश: टेबलवर चढून नाचत होते. हे सर्व नेते नाथांचा नाथ एकनाथ या गाण्यावर नाचताना दिसले. त्यांच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ आता समोर देखील आले आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचं नुकसान करणाऱ्या, त्यांची माणसे फोडणाऱ्या…; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर मनसेचा खोचक टोला

“…त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःख आहे”; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here