शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंकडून खासदार नवनीत राणांचा खरपूस समाचार, म्हणाल्या, याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या…

0
530

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मोठी राजकीय उलथापालथ करत संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरेंनी कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाही. त्यांच्यामध्ये दम नाही. तसं असतं तर ते घरी बसले नसते, असा हल्लाबोल नवनीत राणा यांनी यावेळी केला. यावरून आता शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

105 आमदार, 40 बंडखोर, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष, देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री, निवडणूक आयोगासह तपास यंत्रणांना ज्यांनी तीन महिन्यांपासून कामाला लावले आहे, ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, असा पलटवार सुषमा अंधारे यांनी केला.

हे ही वाचा : “कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

हनुमान चालिसा म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी कोरोना महामारीत लोकांचे जीव वाचवले. गुवाहाटी, हाटील…झाडी…करत फिरायला त्यांच्याकडे ‘टुरिंग टॉकिज’ नव्हतं,  असा टोलाही सुषमा अंधारे यांनी यावेळी नवनीत राणांना लगावला.

दरम्यान, याचं दार, त्याचं दार, बाई माझ्या तोंडात मार, या म्हणीचा उल्लेख करत सुषमा अंधारे यांनी नवनीत राणांवर हल्लाबोल केला.

महत्त्वाच्या  घडामोडी –

आनंद दिघे यांना टाडा लागला तरी, ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत; शिवसेनेचा शिंदे गटावर हल्लाबोल

भाजपची यशस्वी खेळी; शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्यानं केला भाजपमध्ये प्रवेश”

सत्तेविना मती गेली,जो मिळेल त्याच्याशी युती केली; मनसेचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here