Home देश “शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, आम्ही समोरूनच लढतो”

“शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांची औलाद, आम्ही समोरूनच लढतो”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसीय पुणे दाैऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेनेवर जोरदार टीका केली होती.

सत्तेच्या लोभापायी शिवसेनेनं वचन मोडलं. सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आणि ज्यांच्याशी गेली 20 वर्षे भांडत होते त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपद हवं होतं. म्हणून त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शहा यांनी केला होता. यावरून आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.

हे ही वाचा : सांगा पाहू कोण मोठं?; अमित शहा की छत्रपती शिवाजी महाराज?; रूपाली पाटील यांचा सवाल

अमित शहांचं वक्तव्य पूर्णपणे असत्याला धरून असल्याचे उघड झालं आहे. कालच्या संपूर्ण भाषणात अमितभाई नेमकं खरं काय बोलले हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या सरकारविषयी, आमच्या भूमिकेविषयी, आमच्या हिंदुत्वाविषयी प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला गेल्या दोन-अडीच वर्षांपासून भ्रमित करण्याचा प्रयत्न भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. तरीही जनता विश्वास ठेवायला तयार नाही, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.

दरम्यान, आम्ही छातीवर वार झेलणारे आहोत. आम्ही असे पाठीमागून वार करत नाही. शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची अवलाद आहे. समोरून लढा म्हणून आम्हांला शिकवण्याची गरज नाही. आम्ही समोरूनच लढतो. आतापर्यंत समोरूनच लढत आलेलो आहोत, असं जोरदार प्रत्युत्तर राऊतांनी यावेळी शहांना दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

ही शिवसेना आहे की चिवसेना?; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

“महाविकास आघाडी सरकारनं राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची काहीच कारणे शिल्लक ठेवली नाहीत”

महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ ठिकाणी उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक