“महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे”

0
394

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला. सरकारवर तुटून पडण्यात काँग्रेस कमजोर पडली, असं म्हणत शिवसेनेनं काँग्रेसला टोला लगावला. यावर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्रात काँग्रेसमुळे शिवसेना सत्तेत आहे. हीच शिवसेना जाहीरपणे काँग्रेसचे बडे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा अपमान करत असल्याचं राम कदम यांनी म्हटलं आहे. तसेच सत्तेच्या मोहापोटी काँग्रेसचे नेतेमंडळी स्वाभिमान गहाण ठेवून हा अपमान कधीपर्यंत सहन करणार? असा सवालही राम कदम यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या घडामोडी-

चंद्रकात पाटील म्हणजे चंपारण्यातील पात्र; विजय वडेट्टीवारांचा टोला

मनसेच्या खळखट्याक आंदोलनानंतर अ‍ॅमेझॉननं घेतली माघार; 7 दिवसांत मराठी भाषेचा समावेश करणार

“ग्रामपंचायत निवडणुकांनंतर महाविकास आघाडीची झोप उडेल”

मोठी बातमी! रूपाली चाकणकर यांचं कार्यालय पेटवून देण्याची धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here