Home महाराष्ट्र “शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार...

“शिवसेना ही शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालते, शिवसैनिक भगिनींवर वार करणार नाहीत”

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया देत शिवसेनेवर टीका केली.

मा.संजय राऊतजी हिंमत दाखवतं सामनात अग्रलेख लिहून सोनिया गांधी यांना वक्फ बोर्डाच्या जमिनी घोटाळ्यासंदर्भात सार्वजनिकरित्या खुलासा मागावा अन्यथा आपला पुरूषार्थ फक्त एकट्या महिलेला मारहाण करण्यापुरताच आहे हे कबूल करावे, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हणत संजय राऊतांवर निशाणा साधला. आता यावर शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी संघटना आहे. जेंव्हा जेंव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची जाहीर सभा असते, तेंव्हा स्त्रीला सन्मान दिला जातो, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे. त्यामुळे चित्रा वाघांनी सर्कशीतल्या वाघासारखं ज्या लोकांच्यामुळं टीका केली आहे, त्या भगिनीला माझी विनंती आहे. कोणत्याही भगिनीवर शिवसैनिक वार करणार नाहीत, असं प्रत्युत्तर गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिलं.

महत्वाच्या घडामोडी –

“पुण्यामध्ये पुन्हा लाॅकडाऊन! महापाैर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत दिली माहिती”

विनाकारण अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर…; शिवसेनेचा इशारा

भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचं कोरोनामुळं निधन

शिवसैनिकांचे राडे सुरूच राहिले तर भाजप कार्यकर्तेही सक्षम, परिणाम भोगावे लागतील- चंद्रकांत पाटील