नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 16 मधून शिवसेना (शिंदे गट) ने चारही जागांवर विजय मिळवला आहे.
प्रभाग क्रमांक 15 आणि 16 हे दोन्ही प्रभाग राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जातात, त्यामुळे पहिल्या निकालानेच शहरातील राजकीय समीकरणांना वेगळी दिशा मिळाल्याचं चित्र दिसून येत आहे.या विजयामुळे नाशिक महापालिकेतील पुढील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता असून उर्वरित प्रभागांचे निकाल जाहीर होताच शहरातील सत्ता समीकरण अधिक स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रभाग 16 मधून राहुल अशोक दिवे, आशा रफिक तडवी, पूजा प्रवीण नवले आणि ज्योती अनिल जोंधळे यांनी विजय मिळवत शिवसेनेला मोठी आघाडी मिळवून दिली आहे.

