खेडमध्ये शिवसेनेचा भाजपला दणका; भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

0
333

खेड : शिवसेना नेते संजय राऊत आज खेड तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितत आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

जुन्नरच्या शिवसैनिकांचे महाराष्ट्रात वेगळे मार्केट आहे, ते कमी होत नसून राज्यात 55 ठिकाणी भगवा फडकला. जुन्नरमध्येही भगवा फडकायला हवा होता, तो फडकला नसल्याची खंत आहे. तसेच, शिवसेना हे एक मंदिर आहे. डोक्यात राग घालून जायचे आणि परत यायचे, असे करू नका आपले एकच कुटुंब आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी भाषण करताना जो शिवसेनेतून गेला, तो दुसऱ्या घरात सुखी होत नसतो. जे बोचके बाहेर गेले, ते परत आले तरी त्यांना परत घ्यायचे नाही, असं म्हणत संजय राऊतांनी नाव न घेता शिवसेना सोडून गेलल्या आशा बुचके यांच्यावर निशाणा साधला.

महत्वाच्या घडामोडी –

परनॉड रिकार्ड इंडिया फाउंडेशन’तर्फे शिष्यवृत्ती जाहीर

‘बघा हे महाराज विनामास्क बसलेत’, बारामतीत अजित पवारांनी अधिकाऱ्याला खडसावलं

‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; शरद पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here