शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल- नितीन गडकरी

0
203

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीची युती फार काळ टिकणार नाही. आगामी काही दिवसांमध्ये शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी बोलत होते.

निवडणुकीपूर्वी एका पक्षाशी युती करायची आणि नंतर दुसऱ्या पक्षासोबत जायचे, ही गोष्ट सैद्धांतिकदृष्ट्या योग्य नाही. लोकशाहीसाठीही हे बरोबर नाही, असं नितीन गडकरी म्हणाले.

शिवसेनेने निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीविरोधात मते मागितली होती. त्यामुळे जनतेने शिवसेना आणि भाजप या दोघांना मत दिले होते. तरीही केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडणे, हे जनतेला रुचणार नाही, असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं.

शिवसेना कायम बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या हिंदुत्वाचा दाखला देत असते ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मान्य नाही. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसच्या युतीला सैद्धांतिक आधार नाही, ही संधीसाधू युती आहे. जनतेने निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं होतं. तरीही शिवसेनेने या दोन्ही पक्षांशी युती केली. शिवसेनेला याची किंमत मोजावीच लागेल, हा महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात आहे, अशी टीका गडकरी यांनी केली.

दरम्यान, गडकरी यांनी झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

महत्वाच्या घडामोडी –

सनातन संस्थेवर बंदी घाला- हुसेन दलवाई

रणवीर सिंहचा नविन सिनेमातील हटके लुक रिलीज

jio, Vodafone-Idea, Airtel चा ग्राहकांना फटका; रिचार्ज दर वाढणार!

देवेंद्र फडणवीसांना ‘मी’ पणाचा दर्प नडला- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here