“शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत”

0
141

मुंबई : शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपला हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये ते शब्द फिरवणार नाहीत, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बिहार विधानसभा निकालांच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.

बिहारमध्ये संयुक्त जनता दलाला कमी जागा मिळाल्या, तरी भाजप नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपद देईल. शब्द फिरवल्यावर काय उलथापालथ होऊ शकते, हे महाराष्ट्राने भाजपला दाखवून दिले आहे. त्यामुळे भाजप नितीश कुमार यांना दिलेला शब्द फिरवणार नाही, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

“तेजस्वी यादव या निवडणुकीचे ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरले आहेत”

“धनंजय मुंडे लीलावती रुग्णालयात दाखल”

“देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराची धुरा सांभाळल्यांनेच बिहारमध्ये भाजपला यश”

“काँग्रेस म्हणजे बुडते जहाज, गुजरात पोटनिवडणुकांचा निकाल म्हणजे ट्रेलर”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here