“शिवसेना ही शरद पवारांच्या चरणी लीन झाली आहे; प्रवीण दरेकरांचा टोला

0
439

मुंबई : केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पहायला मिळत आहे. या आंदोलनाला शिवसेनेसह महाविकास आघाडीने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसेना ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चरणी लीन झाली आहे, असं म्हणत दरेकरांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

हिंदुत्वाचा विचार सोडून शिवसेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हाच त्यांचे आचार आणि विचार कळाले, असं म्हणत दरेकरांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मैथ्यू वेड-ग्लेन मैक्सवेलची आक्रमक फलंदाजी; ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे लक्ष्य

शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा- निलेश राणे

महत्वाची बातमी!”मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची गर्दी”

‘भारत बंद’ ला राज्यभरात प्रतिसाद, बुलढाण्यात रेल्वे अडवली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here