Home जळगाव शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार

शिवसेनेचं ठरलं; जळगावमधील आगामी निवडणुका तिन्ही पक्ष एकत्रित लढणार

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमच्या तीन पक्षाच्या महाविकास आघाडीने मोठे यश प्राप्त केले आहे, त्यामुळे जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुका आम्ही तीनही पक्ष महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत, असं शिवसेना नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. ते जळगाव येथे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

हे ही वाचा : “लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे; एखाद्या लेखकाने लिहिलेलं मान्य नसेल तर शाईफेक करणे निंदनीय”

जळगाव जिल्हा बँकेवर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षाने एकत्रीत निवडणूक लढवून महाविकास आघाडीचा झेंडा फडकविला. महानगरपालिकेच्या निवडणुकांना अद्याप दोन वर्षे शिल्लक आहेत. पण, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व नगरपालिकेच्या निवडणुका येत्या दोन ते सहा महिन्यात होणार आहेत. त्यात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिले आहेत. जिथे जिथे महाविकास आघाडी होईल, तिथे तिथे महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढण्याचे आदेश आम्ही दिले आहेत. जिल्हा बँक निवडणुकीमुळे आमचे ताकद वाढली आहे, त्यामुळे येत्या जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी मोठे यश मिळविणार आहे, असं चित्र या जिल्ह्यात निर्माण झालं असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यात तीन पक्षाचे सरकार येईल, असे कुणालाही वाटत नव्हते. परंतु तीन पक्षाचे सरकार आले. जिल्हा बँक निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले. मग जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकीत आम्ही नक्की एकत्र येवू, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपाकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेना नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

“मुंबई महापालिकेची निवडणूक संपल्यावर महाविकास आघाडी सरकार कोसळेल”

“मनसेचं आता नवं मिशन; 40 हून अधिक समुद्रकिनारे स्वच्छ करणार”