आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कुडाळ : कुडाळमध्ये नगर पंचायत निवडणूक रंगतदार होणार आहे. काही दिग्गज उमेदवार बऱ्याच वर्षांनंतर निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशातच शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक काँग्रेसचा झेंडा घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे खरोखरच ही निवडणूक शिवसेना व भाजपाची विजयासाठी कसोटी घेणारी ठरणार आहे.
हे ही वाचा : संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नगरसेविकांनी केली तक्रार दाखल
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगर पंचायतीसाठी उमेदवार अजूनही जाहीर केले नाहीत. त्यामुळे आपण निवडणुकीच्या रिंगणात आहोत की नाही, हे त्यांना माहीत नाही. तरीसुद्धा काही जण अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली असून पक्षाला बंडखोरीची कीड लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कुडाळ नगर पंचायतीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली आहे. काँग्रेस आणि भाजपा स्वबळावर लढतील. तसेच सर्वच पक्षांची निवडणुकीची रणनीती आखली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला, महिलांचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही- आशिष शेलार
आशिष शेलारांवर गुन्हा दाखल; देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर गंभीर आरोप, म्हणाले…
2024 मध्ये उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास