आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे ठाकरे समर्थकांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्याला भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
शिवसेना आणि काँग्रेस यांची स्वतःची बाजू कमजोर असल्यावर घटनात्मक संस्थांवर आरोप करण्याची त्यांची पद्धत आहे. या संस्थांना कमजोर करण्याचे प्रयत्न शिवसेना आणि काँग्रेसकडून केले जात आहे. शिवसेनेने जेवढा वेळ मागितला, तेवढा वेळ आयोगाने दिला. आयोगाकडे शिवसेनेने अनेकदा वेळ मागितली होती. पण वेळ काढून कायदेशीर प्रक्रिया टाळता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे ही वाचा : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शिंदे गटाला मिळाली ‘ढाल-तलवार’
आयोगाचा हा अंतिम आदेश नसून तो अंतरिम आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यावर उत्तम म्हणणे आणि मनाविरुद्ध निर्णय दिल्यावर टीका करणे हीच यांची भूमिका आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत अन्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पडल्यावर आयोगाने अशाच पद्धतीने निर्णय दिला आहे. आयोगाविरोधात रडगाणे राजकीय आहे, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
“जनता बाळासाहेबांची छबी राज ठाकरेंमध्ये बघत आहे”
…म्हणून ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडली; मंत्री दीपक केसरकरांचा मोठा गाैफ्यस्फोट