आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : शिवसेनेने मुंबईच्या रस्त्याच्या कामांमधील कंत्राटांमध्ये ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना संधी देण्यासाठी अटींमध्ये फेरफार केलं आहे., अशी टीका मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली.
आगामी निवडणुकीसाठी शिवसेना पैसे गोळा करत आहे, म्हणून हे असले उद्योग सेना करत आहे, असा खळबळजनक आरोप संदीप देशपांडे यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई महापालिकेने ब्लॅकलिस्ट ठेकेदारांना काम मिळावं म्हणून शिवसेना षडयंत्र रचत आहेत. शिवसेनेला निवडणुकीसाठी पैसे गोळा करायचे आहेत, म्हणून ब्लॅक लिस्ट ठेकेदारांना आत घेण्यासाठी पालिकेने टेंडर प्रकियेत बदल केले आहेत., असं देशपांडे म्हणाले.
दरम्यान, पालिकेत विरप्पन गॅंग कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे. सेनेचं या ब्लॅक लिस्ट ठेकेदारांवर कसलं प्रेम आहे, हे आता जाहीर करावं, अशी मागणी देशपांडे यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“महाविकास आघाडी सरकारला येणाऱ्या काळात सळो की पळो करुन सोडू”
तुम्ही मुख्यमंत्री नाहीत हे मनातून काढून टाका; नवाब मलिकांचा फडणवीसांना टोला
राज ठाकरेंचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला, मनसे-भाजप युती होणार?; चर्चांना उधाण
भाजपचा महाविकास आघाडी सरकारला मोठा दणका; पदाधिकाऱ्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश