मुंबई : शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा उलटसुलट चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत शिवसेना व भाजपमधील संबंधांची अभिनेता आमीर खान व किरण राव यांच्या घटस्फोटाशी तुलना केली आहे.
आता आमीर खान आणि किरण राव यांचं पाहा, रस्ते वेगळे झाले आहेत पण मित्र आहेत, तसंच आहे. आमचे मार्ग बदलले आहेत, पण मैत्री कायम आहे. राजकारणात मैत्री कायम राहील. पण याचा अर्थ आम्ही सरकार बनवणार असा नाही, असं संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलं. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून मी हेच बोलतोय. आमचे राजकीय मार्ग बदलले आहेत. मात्र नेत्यांमध्ये संवाद कायम आहेत. शिवसेना-भाजप म्हणजे काही भारत-पाकिस्तान नाही. आमच्यामध्ये भेटीगाठी होत असतात. चर्चा होत असते., असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
शरद पवारांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?; नारायण राणेंचा सवाल
“विधानसभेत जोरदार राडा; भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन”
“31 जुलैपर्यंतच्या MPSC च्या रिक्त जागांबाबत अजित पवारांनी केलेली घोषणा फसवी”
गुंडगिरी करून सत्ता काबीज करता येत नाही; नवाब मलिक यांचा भाजपवर हल्लाबोल