शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान, कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार- किशोरी पेडणेकर

0
270

मुंबई : राम मंदीराच्या मुद्दयावरून मुंबई भाजप युवा मोर्चाने शिवसेनेविरोधात पुकारलेल्या मोर्चादरम्यान शिवसैनिकांनी भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावर मुंबईच्या महापाैर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.

मला खरंच माहिती नाहीये नेमकं काय झालं आहे?, शिवसेना भवन हे आमचं श्रद्धास्थान आहे आणि त्या ठिकाणी डिवचण्याचा कुणी प्रयत्न करणार असतील तर त्या पद्धतीने शिवसैनिक प्रत्युत्तर देणार, असा इशारा किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिला.

दरम्यान, सत्तेत आहोत नक्कीच याची जबाबदारी आहे. पण उगाचच काही करणार असेल कारण नसताना अंगावर याल तर शिंगावर घेणार, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी –

बाळासाहेबांना दिलेल्या वचनाचे कारण सांगून…; प्रवीण दरेकरांची शिवसेनेवर टीका

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे आणि आज महिलांवर हात उगारणारी शिवसेना कुठे?- केशव उपाध्ये

शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली; शिवसेना भवनासमोरील राड्यावरून आशिष शेलारांचा हल्लाबोल

“शिवसेना भवनासमोर राडा, शिवसैनिकांकडून मारहाण झाल्याचा भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा आरोप”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here