“शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नितीन राऊत यांचा गेम केला”

0
312

परभणी : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा गेम केला., असं वक्तव्य माजी मंत्री व भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. ठाकरे सरकारला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बबनराव लोणीकर यांनी परभणीत पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.

नितीन राऊत यांनी वीजबिल माफीची घोषणा केली होती. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा गेम केल्यामुळे नितीन राऊत यांना आपल्या वक्तव्यावरुन घुमजाव करावं लागलं, असं लोणीकर म्हणाले.

दरम्यान, महाविकासआघाडीने वर्षभरापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केलेली नाही. हे सरकार नापास झाले आहे, असं म्हणत लोणीकरांनी सरकारला टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री सई लोकूर अडकली विवाहबंधनात; सोशल मिडियावर फोटो व्हायरल

“भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचं कोरोनामुळे निधन”

Breaking News!”अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेेनेत प्रवेश करणार”

मोठी बातमी! “पदवीधर निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या नावाने खोटा प्रचार”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here