आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नागपूर : गोव्यातील भाजपच्या विजयानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरात आले. यानंतर आज नागपुरात भाजपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आला. विमानतळापासून रेडिसन ब्ल्यू हॉटेलपर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय.
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपले नशीब आजमावयला आले होते. पण, गोव्याच्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखविली. शिवसेना, राष्ट्रवादीचे हे मुंगेरीलाल के हसीनं स्वप्न होते, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी लगावला.
हे ही वाचा : “मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”
गोव्यात कार्यकर्त्यांच्या मदतीने भाजपनं संधीचं सोनं केलं. गोव्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही प्रचारासाठी आले होते. गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, मणिपूर याठिकाणी भाजपला मिळालेलं मत हे विकासाला मिळालेलं मत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देश बदलतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
नितीन गडकरींच्या माध्यमातून रस्ते तयार होत आहेत. देशात प्रत्येकाला मोफत कोरोना लसीकरण करण्यात आलंय. वीस हजार लोकांना युक्रेनमधून काढण्यात आलं. हे भाजपप्रती असलेलं विश्वासाचं वातावरण आहे, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या घडामोडी –
“माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचं निधन, कोपरगाव येथील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास”
सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए; चंद्रकांत पाटलांचा मविआ सरकारला टोला
“प्रवीण दरेकरांना दिलासा नाहीच, ‘या’ प्रकरणातील दाखल याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली”