Home महाराष्ट्र आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन होतानाची तत्कालीन परिस्थिती तसेच भाष्य करताना माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना आणि भाजपमधील अंतर वाढलं होतं असं सांगितलं, आता यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया देत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

महाविकास आघाडीचा औट घटकेचा खेळ संपून आता आघाडीतून बाहेर पडून भाजपासोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये चुरस निर्माण झाली आहे, परंतु गेल्या दोन वर्षांत या पक्षांनी आम्हाला दिलेली वागणूक पाहता यातील कोणाशीही युती करण्याची आमची इच्छा नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे ही वाचा : शिवसेनेत पक्षप्रवेशाचं वादळ; अनेक युवा कार्यकर्त्यांनी हाती बांधलं शिवबंधन”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना बहुमतासाठी काही लोकांची मदत हवी असेल तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करु, असं मी त्यावेळी म्हणालो होतो. ते माझं एक वाक्य शिवसेना तसेच भाजपमध्ये अंतर वाढवण्यासाठी महत्त्वाचं ठरलं, असं शरद पवार म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी – 

“नितेश राणेंच्या अडचणीत वाढ, राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला”

शरद पवार म्हणाले, माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना-भाजपमधील अंतर वाढलं; चंद्रकांत पाटील म्हणतात…

“…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी