शिवसैनिकांचा किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला?; किरीट सोमय्या महापालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले

0
377

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जात होते. यावेळी सोमय्या यांच्याविरोधात पुण्यात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. इतकंच नाही तर काही शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे सोमय्या यांना त्या ठिकाणावरून काढता पाय घ्यावा लागला.

शिवसैनिकांनी सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केलं आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असं ट्वीट सोमय्या यांनी केलं आहे.

हे ही वाचा : उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचं आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

उदयनराजे भोसले पुन्हा राष्ट्रवादीत जाणार?; अजित पवारांसोबत भेटीनंतर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

‘…म्हणून मला बाजूला करण्यात आलं’; एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘मुंबईत ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’; आता किशोरी पेडणेकर म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here