मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कालपासून जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांनी शिवाजी पार्क इथं जात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक झाले. त्यानंतर संध्याकाळी काही शिवसैनिकांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीसांनी यावेळी केला.
दरम्यान, बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असंही फडणवीसांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो, आम्हांला मागायला हवा होता, आमच्याकडे भरपूर आहेत- नारायण राणे
आम्ही निघून गेल्यानंतर गोमूत्र शिंपडलं, समोर असता तर तेच गोमूत्र…; निलेश राणेंचा हल्लाबोल
“आमदार गोपीचंद पडळकरांनी करून दाखविलं, पोलिसांना गुंगारा देत अखेर बैलगाडी शर्यत संपन्न”
अडवण्याची भाषा करणाऱ्यांनी पुढच्या वेळी चड्डीत राहायचं; नितेश राणेंचा घणाघात