“महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून शिवजयंती ही तिथीनुसार साजरी करावी”

0
271

औरंगाबाद : महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे म्हणून महाराष्ट्रात 365 दिवस शिवजयंती साजरी झाली पाहिजे, असं मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे बुधवारी औरंगाबाद येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात बोलत होते.

आपण जे वर्षभर सण साजरे करतो ते तिथीनुसार करतो. कोणताच सण तारखेनुसार साजरा केला जात नाही. महाराजांची जयंती आपल्यासाठी एक सण आहे. त्यामुळे तो एका सणाप्रमाणेच साजरा झाला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवजयंती साजरी होत असताना गालबोट लागणार नाही याची काळजी घ्या असं आवाहनही राज ठाकरे यांनी यावेळी केलं.

महत्वाच्या घडामोडी-

मध्यप्रदेशसारखी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण करायला भाजपला अनेक जन्म घ्यावे लागतील- धनंजय मुंडे

“शिमगा नुकताच संपल्यामुळे विरोधकांना कुठला मुहूर्त शिल्लक राहिलेला नाही”

महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्ष टिकेल यात शंका नाही- शरद पवार

” गो कोरोना नाही, तर मग काय कम कोरोना असं म्हणू का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here