आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही योजना सुरू केली होती. मात्र आता ही शिवभोजन थाळी बंद होणार, अशा चर्चांनी राज्यात जोर धरला आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवभोजन थाळी ही बंद होणार नाही ती सुरूच राहील, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यमंत्रीमंडळच्या बैठकीनंतर दिलं आहे.
हे ही वाचा :शिवभोजन थाळी चालू राहणार की बंद?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेले बहुतांश निर्णय हे शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द करण्यात येत आहेत, तर काही निर्णय हे बदलले जात आहे. त्यामुळे राज्यातील शिवभोजन थाळी ही महाविकास आघाडीची योजना बंद होईल, अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र शिवभोजन थाळी बंद होणार नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री शिंदेनी यावेळी दिलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू, थापा शिंदे गटात का गेले?; शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
‘आमची निष्ठा राज ठाकरे आणि मनसेसोबतच’, मनसैनिकांनी दिले एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्रं
‘.. या कारणासाठी राष्ट्रवादी-भाजपचे बडे नेते एकाच मंचावर’ ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण