मुंबई : राज्यात सर्वसामान्यांना शिवभोजन एकदाच मिळतं, दुसऱ्यांदा काय लोकांनी उपाशी राहावं का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. लोकसत्ता वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
शिवभोजन लाख-दीड लाख लोकांना दिलं जाते. त्यामुळे गरिबांच्या पोटाला अन्न मिळतेय. पण शिवभोजन तर फक्त दिवसातून फक्त एकदाच दिलं जातं. दोनदा दिलं जात नाही. तेही फक्त दोन-तीन तास. लोकांनी एकदाच जेवावं आणि दुसऱ्यांदा उपाशी राहावं, असं तर आपल्याला करता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्य सरकारने सर्वसामान्या लोकांच्या खाण्यापिण्यासाठी योग्य नियोजन करावे. कम्युनिटी किचनच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत जेवण पोहचवावं. सरकारने प्रक्टीकल विचार करायला हवा, असंही फडणवीस म्हणाले.
दरम्यान, सरकारचे अंग बचावचे धोरणही चुकीचं आहे. लवकरच सरकारने आपलं धोरण बदलावं अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर केली आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तबलिगी प्रकरणावरुन राजकारण करू नका- देवेंद्र फडणवीस
“मला माफ करा, पण त्याशिवाय पर्याय नव्हता”
मंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये समन्वय नाही; देवेंद्र फडवीसांचा राज्य सरकारवर निशाणा
आव्हाड साहेब तुम्ही योग्यच केलं, आम्ही तुमच्या सोबत आहोत- रुपाली चाकणकर