मुंबई-:अंतर्गत खेळीने शरद पवारांचा डाव फसला
अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे पुन्हा एकत्र येणे शक्य असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. खुद्द शरद पवार यांचीही तशीच इच्छा असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. पुढील नेतृत्वाची जबाबदारी सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्याकडे देण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी स्वतंत्र भूमिका घेत शरद पवारांचा डावच उधळून लावल्याचे समोर येत आहे. त्यांनी वेगळी ‘चूल’ मांडत आपली राजकीय दिशा स्पष्ट केली. शरद पवार यांना याची कल्पना उशिरा, तब्बल तिसऱ्या दिवशी झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सुनेत्रा अजित पवार यांच्या हाती पक्षाची सूत्रे देत शरद पवारांनी आखलेली रणनीतीच मोडीत निघाली आहे. आता त्या खासदारकीचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून, पुढील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची चिन्हे आहेत.

