मुंबई : शरद पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. बाळा नांदगावकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वाढीव वीजबिला विरोधात मनसेच्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते बोलत होते.
वाढीव वीजबिल माफ करावं म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर पवारांना निवेदनही दिलं. त्यावेळी पवारांनी या संदर्भात राज्य सरकारशी चर्चा करतो म्हणून आश्वासनही दिलं. मात्र, त्यानंतरही काहीच निर्णय झाला नाही. त्यामुळे पवारांच्या शब्दाला राज्य सरकारमध्ये किंमत उरली नाही, असं आम्हाला वाटतंय, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.
पवारसाहेब तुमचं आणि राज साहेबांचं बोलणं झालं आहे. या सरकारचे सर्वेसर्वा तुम्ही आहात. आज कॅबिनेटची मीटिंग होणार आहे. त्यामुळे तुमचा आदेश द्या आणि राज्यातील साडे अकरा कोटी लोकांना दिलासा द्या, असं म्हणत सरकारने निर्णय घ्यावा, लोकांचं वीजबिलं माफ करा, असंही बाळा नांदगावकरांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण”
…आणि मग Penguin Gang ची पार्टी सुरु; वीज बिलांवरून नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
“ज्यांचे पूर्वज इंग्रजांना मदत करत होते त्यांनी आम्हाला देशप्रेम शिकवू नये”