हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढत मंत्रालयात फोन

0
329

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा हुबेहूब आवाज काढत मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांना बुधवारी फोन आला. त्या व्यक्तीने बदलीसाठी शरद पवार यांचा आवाज काढत आशिष कुमार सिंह यांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरून हा फोन केला आहे अशी माहिती फोन करणाऱ्या व्यक्तीने दिली. त्यामुळे काही वेळासाठी मंत्रालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मंत्रालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही या प्रकरणात शोधाशोध करत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पडताळणीसाठी मंत्रालयातून सिल्व्हर ओकमध्ये फोन केला. त्यानंतर हा फोन कॉल सिल्व्हर ओकमधून नसल्याचे स्पष्ट झालं.

मंत्रालयातून या कॉलचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार या खोट्या कॉलच्या प्रकरणात गांवदेवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या फोनच्या प्रकरणात खंडणविरोधी पथकाने एकाला पुण्यातील जेऊर येथून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, हा फोन नेमक्या कोणत्या कारणासाठी आणि काय उद्देशासाठी केला आहे याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट होऊ शकली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

शाळेबद्दल एक ठोस निर्णय सरकारने दिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

नागपुरात शिवसेनेचा भाजपला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश

“आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”

रावसाहेब दानवेंनी रूग्णालयात बसून पैसे वाटले, म्हणून माझा पराभव झाला; चंद्रकांत खैरेंचा गाैफ्यस्फोट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here