मुंबई : राज्यातील पोलीस दलातील बदल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास शरद पवार आणि अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले. त्यानंतर साधारण 45 मिनिटांनी गृहमंत्री अनिल देशमुख मातोश्रीवर निघाले. त्यानंतर केवळ शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांचीच चर्चा झाली.
मुंबई पोलीस दलातील बदल्या, पारनेरमधील नगरसेवकांची फोडाफोडी, सहकारी पक्षांमधील समन्वय, अधिकाऱ्यांची मर्जी आणि मर्जीतील अधिकारी अशा विविध मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत धुसफूस आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस दलातील 12 उपायुक्तांची दोन जुलैला बदली करण्यात आली होती. मात्र या बदल्यांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्रालय कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठा आरक्षण वाचवलं पाहिजे- देवेंद्र फडणवीस
जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री हवाच कशाला?; नारायण राणेंचा सवाल
महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे- देवेंद्र फडणवीस
वाट्टेल ती किंमत मोजून सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्यात, पण…- संजय राऊत