मुंबई : कोरोनाचं संकट भारतात आल्यापासून महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे युद्धपातळीवर काम करत असल्याचं दिसून येत आहे. आरोग्यमंत्र्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतूक केलं जात आहे. यावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मत व्यक्त केलं आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संस्कारामुळे जबाबदारीला प्राधान्य दिल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.किल्लारी भूकंपावेळी पवार साहेबांना स्वत: पुढाकार घेऊन पुढे होऊन परिस्थितीचा सामना करताना पाहिलंय, तेच संस्कार माझ्या मनावर झाले आहेत. असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
दिवसभर वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या बैठका, आरोग्य विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा, पत्रकार परिषदा अशा व्यस्त वेळापत्रकामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची सध्या दमछाक होतेय. मात्र कोरोनाचं संकट परतवून लावण्यासाठी टोपे मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
जातियवादाच्या कोरोनाव कधी आळा बसणार- रामदास आठवले
“सध्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज”
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली दिलासा देणारी ‘ही’ मोठी बातमी
कोरोनाविरोधात एकत्र न येता सोशल मीडियातून एकत्र येऊ म्हणत रोहित पवारांनी शेअर केलं मॅशअप साँग