आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची देखील ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली. या भेटीमुळं राज्यातील राजकीय समीकरणे मात्र बदलणार आहेत. या बैठकीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीबाबतची माहिती दिली.
हे ही वाचा : “काँग्रेस हाच भाजपला सक्षम पर्याय; भाजपविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढली पाहिजे”
भाजपाला देशात सक्षम पर्याय तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली. यासाठीच ममता बॅनर्जी यांनी आमची भेट घेतल्याचं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, सगळ्यांनी मिळून भाजपाला सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला पाहिजे. 2024 च्या निवडणुकांमध्ये हा पर्याय उपलब्ध व्हायला हवा. यासाठीच त्यांनी आमची भेट घेतली आहे. आमची सकारात्मक चर्चा झाली आहे, असंही शरद पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
ठाकरे सरकारकडून दोन वर्षांत दबाव आणि दडपशाहीचं राजकारण; भाजपची टीका
…म्हणून रामदास आठवलेंनी घेतली अमित शहांची भेट
आदित्य ठाकरे – ममता बॅनर्जी यांच्यातील बंद दाराआड चर्चेवर भाजप आक्रमक ; केली ‘ही’ मागणी