आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे देवी अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या लोकर्पणासाठी सांगलीत आले आहेत. अशातच त्यांनी सांगलीमध्ये भाजपला मोठा धक्का दिला आहे.
सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते शिवाजीराव नाईक यांनी भाजपला रामराम ठोकत आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
हे ही वाचा : गुढीपाडव्यानिमित्त मनसेची शिवाजी पार्क आणि शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
दरम्यान, नव्या वर्षाची आज सुरुवात होत आहे. नाईक यांनी पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादीला हातभार लावण्याचा निर्णय ज्यांनी घेतला त्यांच स्वागत आज आपण करतोय. योग्य असेल तर स्वागत करणार. नसेल तर पडेल ती किंमत मोजणार असा हा जिल्हा आहे. महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याचा इतिहास शिराळा शिवाय पूर्ण होत नाही. शिवाजीराव जिल्हा परिषदेचे यशस्वी अध्यक्ष राहिले आहेत. आज ते पुन्हा घरी येताहेत. घराचं रक्षण करण्याचं सूत्रं त्यांनी स्वीकारलंय. त्यांचं मी स्वागत करतो. नाईक यांच्या अनुभवाचा उपयोग राज्य पातळीवर कसा करून घेता येईल याचा विचार झाला पाहिजे, असं शरद पवार यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“रसेल द मसल शो; आंद्रे रसेलच्या विस्फोटक खेळीच्या जोरावर KKR चा पंजाबवर 6 विकेट्सने दणदणीत विजय”
आता पुढील नंबर अनिब परब यांचा असून लवकरच त्यांनी बॅग भरावी; किरीट सोमय्यांचा सल्ला
“भाजपचा राष्ट्रवादीला दणका; ‘हा’ मोठा नेता पुन्हा स्वगृही परतला”