माझी कोणाविरोधात नाराजी नाही, पण विचारधारेशी तडजोड करून मला उमेदवारी नको; गिरीश गुरनानी यांनी नाकारला AB फॉर्म

0
142

पुणे – राज्यातील मुंबईसह एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढविणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यामुळे आता शरद पवारांच्या एका कार्यकर्त्याने निवडणूक लढविण्यास नकार दिला दिला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कोथरुड विधानसभा युवक अध्यक्ष गिरीश गुरनानी यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे.

गुरनानी म्हणाले, पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी आपण अर्ज भरलेला आहे आणि पक्षाकडून AB फॉर्म सुद्धा देण्यासाठी विचारणा केली आहे. राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार साहेबांसोबत एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांपिकी मी एक. कोथरूड भागात फक्त राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण विरोधकांची बाजू लाऊन धरणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख. जनसेवा, समाजकारण आणि पुरोगामी विचारधारा ही माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी राहिलेली आहे.

मात्र, पुणे महापालिका निवडणुकीसाठी घोषित झालेल्या दोन्ही राष्ट्रवादीची युती आणि त्यातून मला विचारणा करण्यात आलेल्या उमेदवारीला मी नैतिकतेच्या आधारावर देत असलेला नकार मी माझ्या पक्षश्रेष्ठींना कळविलेला आहे. महाविकास आघाडी असेल तर मी निवडणूक लढवायला तयार आहे. परंतु, ज्यांना टोकाचा विरोध केला, ज्यांच्या विरोधात, पवार साहेबांवर टीका केली म्हणून आपण आंदोलन केले, जे सध्या एका विरुद्ध विचारधारेच्या पक्षासोबत सत्तेत आहेत अशा लोकांबरोबर हातमिळवणी करणे माझ्या तरी मनाला काही पटलेले नाही. माझी कोणाच्याही विरोधात नाराजी नाही. परंतु विचारधारेशी तडजोड करून, मला उमेदवारी नको आहे. तरी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार आणि मी लढत नसल्याने ज्यांना वाईट वाटले असेल त्यांची मनापासून माफी मागतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here