आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : कर्जत नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. अशावेळी राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. रोहित पवार यांच्या खेळीमुळे भाजप शहराध्यक्ष वैभव शहा यांची पत्नी राखी शहा यांच्यासह नीता कचरे, पूजा कचरे, नजमा बागवान, सुनंदा पिसाळ या भाजप उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यानंतर भाजपकडून रोहित पवारांवर टीका होत आहे. यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : शंभूराज देसाई जिल्हा बँकेतील पराभवाचा वचपा काढणार?; नगरपंचायत निवडणूकीतून घड्याळ गायब; चर्चांना उधाण
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत ऐनवेळी भाजप उमेदवाराचा पाठिंबा मिळवण्याची वेळ राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्यावर आली आहे. हा रोहित पवारांचा निवडणुकीपूर्वीच झालेला पराभव आहे., अशी टीका चंद्रकांत पाटलांनी रोहित पवारांवर केली.
दरम्यान, शरद पवारांचा वारसा, राज्यात सत्ता, अजित पवार उपमुख्यमंत्री असूनही रोहित पवार यांना एकेका जागेसाठी झुंजावं लागतंय, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली. याचाच अर्थ असा होतो की जनता भाजपासोबत आहे आणि आमचा विजय निश्चित आहे. सत्तेचा दुरूपयोग आणि धनशक्ती विरोधात असली तरी जनशक्ती आपल्याकडे असल्याने राम शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार संघर्ष करा, असं पाटील म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
युतीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रस्ताव; राज ठाकरेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
“महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा”
“…म्हणून राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडसावलं”; म्हणाले, ‘स्वत:ला राज ठाकरे समजू नका’