औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यभरात विविध ठिकाणी भेट देऊन कोरोनाच्या स्थितीची प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. तसेच उपाययोजनांचा आणि नागरिकांच्या प्रश्नांचा आढावा घेत आहेत. ते आज औरंगाबादमध्ये आले असताना त्यांनी राज्यातील खाजगी रुग्णालयांना सल्ला वजा इशारा दिला आहे .
कोरोनाच्या या संकटात खाजगी रुग्णालये आणि डॉक्टरांनी पूर्ण सहकार्य केलं पाहिजे. जर जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय क्षेत्रातील लोकांकडे मदत मागितली तर ती दिली पाहिजे. कोणी देत नसेल, तर हॉस्पिटल ताब्यात घेऊन समज देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राज्यात सध्या बेड वाढवण्याची गरज आहे. ही एक कमतरता असून, खाजगी डॉक्टरांना या आजारात साथ द्यावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…तर आरोग्य विभागात मुलाखतीशिवाय…; राजेश टोपेंनी केली ‘ही’ मोठी घोषणा
सरकारला देवेंद्र फडणवीस हे संताजी-धनाजीसारखे दिसतात; भाजपचं मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकाला कोरोनाची लागण
भगतसिंग कोश्यारी यांचं व्यंकय्या नायडूंना पत्र; म्हणाले…