आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : केंद्र सरकारने दिवाळी निमित्त देशातील नागरिकांना मोठी भेट दिली आहे. केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलमध्ये 5 रूपयांची तर डिझेलच्या दरात 10 रुपयांची उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारने देखील इंधनावरील कर कमी करावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : …त्यामुळे राज्यातील भाजपाचे नेते महाराष्ट्रद्रोही आहेत; काँग्रेसची टीका
केंद्र सरकारने यावेळी पेट्रोल डिझेलचे दर कमी केले आहेत याबाबत राज्यातील लोकांना काही दिलासा मिळू शकतो का असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला असता, पवार म्हणाले की, राज्य सरकारने निश्चित दिलासा देऊ असं म्हटलं आहे. पण केंद्र सरकारने राज्याचे जीएसटीचे देणं आहे ते लवकर द्यावे म्हणजे लोकांना अशा प्रकारची मदत करण्याचा निर्णय घेता येईल.
दरम्यान, एसटी संघटनेतील व्यक्ती मला भेटले होते. त्यांनी हा संप पुढे न्यायचा नाही हे सांगितले होते. दिवाळीच्या काळात नागरिकांना त्रास देणे योग्य नाही अशी आमची भूमिका आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली आहे म्हणून हे घडत आहे., असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
हेराफेरी-4 साठी परफेक्ट काॅम्बिनेशन, त्यात नवाबला ‘बाबू भाई’ चा रोल द्या- नितेश राणे
सांगली जिल्ह्यात शिवसेना-राष्ट्रवादीच्या गटात आणि भाजपा गटत जोरदार राडा