आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
लोकसभा निवडणुकीच्या निकाल जाहीर होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
“हा निकाल झाल्यानंतर मी काही सहकाऱ्यांशी चर्चा केली. विशेषत: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते आणि इतर प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. कदाचित दिल्लीत आज संध्याकाळी आमची बैठक पार पडेल. या बैठकीत आम्ही सामंजस्याने निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम
आज अनेक चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही महाराष्ट्रात 10 पैकी 7 जागांवर आघाडीवर आहोत. हे यश फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचं यश आहे, असं मी मानत नाही. काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि आमचे सर्व सहकाऱ्यांनी मेहनत केली त्यामुळे हे यश सगळ्यांना मिळालं.महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेचे खबरदारी घेऊ, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शिरुरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांना धक्का; अमोल कोल्हे आघाडीवर कायम
चंद्रपूरमध्ये भाजपाला मोठा धक्का; सुधीर मुनगंटीवार 1 लाख मतांनी पिछाडीवर
अजित पवारांना मोठा धक्का; अजित पवार गटाची कुठेही आघाडी नाही