मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी, राजकीय नेत्यांनी अतिवृष्टी झालेल्या भागात दौरे केल्यास त्यांच्यासाठी यंत्रणा फिरवावी लागते. यामुळे अतिवृष्टी झालेल्या भागात ज्यांच्या संबंध नाही त्यांनी जाणे टाळावं, असं आवाहन केलं होतं. यावर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. जाणते पवार आज बोलतात. उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचे लोक देखील त्यांना गांभीर्याने घेत नसतील, असा टोला भातखळकरांनी शरद पवारांना लगावला.
दरम्यान, माझा पूर्वीचा अनुभव आहे. विशेषतः लातूरचा. कारण नसताना अनेक लोक अशा ठिकाणी दौरे करतात. माझं अशा सर्वांना आवाहन आहे की, पूरग्रस्त भागात शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि कार्यकर्ते पुनर्वसनाच्या कामामध्ये लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यांचं लक्ष विचलित होईल, अशा पद्धतीचे दौरे टाळण्याचा प्रयत्न करा,असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
जाणते पवार आज बोलतात, उद्या कोलांटी मारतात. त्यामुळे बाहेरचे सोडा घरचेही त्यांना फार गांभीर्याने घेत नसावेत… @PawarSpeaks @RRPSpeaks pic.twitter.com/Gmw23JfFYH
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सांगलीत आलेल्या महापुरा साठी ‘मराठा बिझनेस असोसिएशन’ द्वारे स्वच्छता मिशन व फिनेल वाटप
आज राज्य मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार; केशव उपाध्येंकडून ‘हे’ 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित
…यावरून कळतं की, या सरकारला महाराष्ट्राच्या लोकांची किती काळजी आहे; निलेश राणे
“भाजपसोबत युती नाही, नाशिकमध्ये मनसे स्वबळावर लढणार”