“मुख्यमंत्री होण्यापूर्वी शरद पवारांनी 40 गोष्टी लिहल्या आणि 38 गोष्टी पूर्णही केल्या”

0
1495

मुंबई : शरद पवारांनी मुख्यमंत्री होण्यापूर्वी 40 गोष्टी लिहून काढल्या होत्या. त्या त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात त्या पूर्ण केल्या, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील म्हणाले.लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

मला हे प्रमोद महाजन यांनी सांगितलं होतं. शरद पवार तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. या तीन टर्ममध्ये त्यांनी 40 पैकी 38 गोष्टी पूर्ण केल्या होत्या. असं त्यांच्याकडे व्हिजन होतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवारांकडे अजेंडा होता. असं व्हिजनही त्यांच्याकडे होतं अजेंडा होता. असं व्हिजन उद्धव ठाकरे यांच्याकडं आहे का? हे पूर्ण व्हिजन अजित पवारांकडे आहे का?,’ असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी-

मागचे 5 वर्षे शरद पवार बसलेच होते उपाशी असल्यासारखे- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे अजेंडा आणि व्हिजन नाही- चंद्रकांत पाटील

अजित पवारांवर पीएचडी करण्याची माझी इच्छा आहे- चंद्रकांत पाटील

राज्य सरकारच्या आदेशाचा चंद्रकांत पाटलांना विसर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here