Home महाराष्ट्र “शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये...

“शरद पवार देशातील सुसंस्कृत नेतृत्व, पडळकरांनी त्यांच्याविषयी बोलताना काळजी घ्यावी, अशी वक्तव्ये खपवून घेणार नाही”

मुंबई : सोलापुरमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात युवकाने दगडफेक केल्याची घटना काल घडली होती. या घटनेवर प्रतिक्रिया देत पडळकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर खालच्या शब्दात टीका केली होती.

रात गेली हिबेशात, पोरगं नाही नशिबात’, असं म्हणत पडळकरांनी पवारांवर हल्लाबोल चढवला. तसंच सगळे जण पवारांना मोठा नेता मानत असतील पण मी मानायला तयार नाही, असंही पडळकरांनी म्हटलं. यावर राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली.

शरद पवार हे देशातील सुसंस्कृत नेतृत्व आहे. त्यांच्यावर अशा शब्दात बोलणं शंभर टक्के चुकीचं आहे. महाराष्ट्राची भूमी ही महिलांचा मानसन्मान करणारी भूमी असून अशाप्रकारे वक्तव्य करणं हे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. पडळकरांच्या वक्तव्याचा मी निषेध करत करतो. इथून पुढे बोलताना त्यांनी काळजी घ्यावी, अशी वक्तव्य आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा निलेश लंकेंनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

कुणाचाही आधार घेईन, पण एक दिवस पंतप्रधान नक्की होणार- महादेव जानकर

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; गोपीचंद पडळकर आक्रमक

“संभाजी भिडे चुकीची वक्तव्य करून महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा”

“तुम्ही तरी एकच काच फोडली, आम्ही एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही”