“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला दिलेली धमकी”

0
453

मुंबई : महाविकास आघाडी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शिवसेनेसोबत लढणार अशी घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी केली. यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेब आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार, असे म्हणालेले आहेत. जरी शरद पवार साहेब असे म्हणालेले असले तरी शरद पवार साहेब कधीही शिवसेनेबरोबर निवडणूक लढवणार नाहीत, असं नारायण राणे म्हणाले.

ही त्यांनी काँग्रेसला दिलेली धमकी आहे. माननीय शरद पवार साहेब जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा त्याचा उलट अर्थी अर्थ लावायचा असतो., असा टोला नारायण राणेंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

बसमधूनच 10 मानाच्या पालख्यांना वारीची परवानगी, विठ्ठल मंदिरात भाविकांना प्रवेश नाही- अजित पवार

“प्रसिद्ध अभिनेते बोमण ईराणी यांच्या आईचे दु:खद निधन”

“स्वतःला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”

निवडणूक स्ट्रॅटेजिस्ट प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here